लॉक डाउनमध्येही वाळू माफियांची मुजोरी सुरूच



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरू आहे. सर्व उद्योग, धंदे, व्यापार, कामे बंद आहेत. याचा मोठा परिणाम समाज जीवनावर होत असला तरीही जीवपेक्षा काहीच मोलाचे नसते या उक्तीप्रमाणे सर्वजण आपापल्या घरामध्ये शांत बसून आहेत मात्र या भीषण परिस्थितीमध्येही एक वर्ग असा आहे की जो या लॉकडाउनला न जुमानता आपले काळे धंदे सुरूच ठेवत आहे आणि तो वर्ग म्हणजे वाळू माफिया… तालुक्यात लॉकडाउनच्या काळातही हा वर्ग आपले डोके वर काढू पाहत असून चोरी छुपे वाळूची तस्करी करत असल्याचे कालच्या एका घटनेवरून समोर आले आहे. 

दि.२७ एप्रिल रोजी साधारण  ०१ वाजून १० मिनिटांच्या सुमारस मौजे सोनवडी ता. दौंड जि पुणे या गावच्या हद्दीमध्ये दौंड बाजुकडुन जाणाऱ्या रोडवर  ट्रक नंबर एम.एच १६ ए ई वरील चालक आरोपी हा संपुर्ण देशभरात कोरोना रोगाचा फैलाव होवु नये म्हणुन मा. महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश अन्वये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागु करण्यात आली असतानाहि आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये बेकायदेशीर बिगर परवाना एकुन ४ ब्रास वाळु चोरी करुन घेवुन जात असताना मिळुन आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी किशोर हनुमंत वाघ नेमणूक दौंड पोलीस स्टेशन यांनी त्या ट्रक चालकाविरुद्ध फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध ३७९ आणि १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.