महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, अभिषेक बाबतही वाईट खबर!



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना सध्या अनेक सेलिब्रिटी, महत्वाच्या राजकीय व्यक्ती तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढत आहे. आता यात पुन्हा बॉलिवूडची भर पडली असून बॉलिवूडचे महानायक आणि अबाल वृद्धांच्या मनावर अधिराज्य स्थापन केलेल्या अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या बाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. 

पहा अमिताभ यांचे ट्वीट

अमिताभ बच्चन यांना सध्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. यानंतर अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजत असून यामुळे बच्चन कुटुंबीय आणि बॉलीवूडच्या चिंता वाढल्या आहेत.