दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगाव येथे शेतामध्ये काम करत असलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. राजू सुपेकर (रा.केडगाव ता.दौंड )असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून हि घटना ओमशिव पेट्रोल पंप(आर्यन लॉन्स)च्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजू सुपेकर हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला यावेळी त्यांना वाचविण्यासाठी आलेला त्यांचा चुलत भाऊही विजेचा जोरदार धक्का बसून बाजूला फेकला गेला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते या धक्क्यातून बचावले मात्र राजू सुपेकर हे मात्र जागीच मृत्युमुखी पडले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.