डॉक्टरांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा : डॉक्टर संघटनेचे यवत पोलिसांना निवेदन



पुणे / दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

कोरोना काळामध्ये दौंड तालुक्यातील विविध गावांतील डॉक्टरांना अफवांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या संकटकाळातही रुग्णांना धीर देणाऱ्या, त्यांची तपासणी करून त्यांना आधार देणाऱ्या डॉक्टरांना या अफवांमुळे खूपच मानसिक दडपणातून जावे लागले. अनेकांनी तर हा पेशाच नको अशी इच्छाही बोलून  दाखवली. हे सर्व होताना आता डॉक्टरांच्या पाठीशी डॉक्टर असोसिएशन उभे राहिले असून अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी डॉक्टरांनी आपबिती सांगताना अमुक डॉक्टरांना कोरोना झाला असेल, त्यांना तेथून हलवा, त्यांकडे कोणी जाऊ नका. अशा प्रकारच्या अफवा पसरवून डॉक्टरांना बदनाम करण्यात आले. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंड रूरल असोसिएशनने यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जे.डी थोरात, डॉ.शामराव कुलकर्णी, डॉ.वंदना मोहिते,  डाॅ संदीप देशमुख, डॉ.अमित थोरात, डॉ.राजगुरु हे उपस्थित होते. यावेळी यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आश्वासन दिले.