पुण्यात व्हाट्सअप वर ‛मटका’, पोलिसांनी दिला मटका क्वीनला ‛झटका’



पुणे : सहकारनामा ऑनलाईन 

पुण्यात सर्वत्र लॉकडाऊन असतानाही व्हाट्सअप वर मटका घेऊन धंदा चालवणाऱ्या मटका क्वीन महिलेला पोलिसांनी चांगलाच झटका दिला आहे. 

बंडगार्डन पोलिसांनी या महिलेला ताडीवाला रोड परिसरातून अटक केली आहे. रेश्मा (वय 40) असे या मटका क्वीन  महिलेचे नाव असून ती पठाण भाऊ नामक व्यक्तीसाठी काम करत असल्याचे तिच्या बोलण्यातून समोर येत आहे. आता तिच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांना हि महिला व्हाट्सअप वरून मटका घेता असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती काढून ताडीवाला रोड परिसरात महिला पोलिसांसह धाड मारत  या महलेला मटका घेत असताना रंगेहात पकडले. यावेळी तिच्याकडून मटक्याची रोख रक्कम व मटका घेण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.