ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार, विरोधकांच्या गदारोळात विधानसभेत विधेयक मंजूर



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन.

आज विधानसभेमध्ये सरपंच निवडीबाबत राज्य सरकाने ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार असल्याचे विधेयक मंजूर करून घेतले आहे मोठ्या गदारोळात हे मंजूर करण्यात आले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांना आपले सरपंच लोकमतातून निवडून येणार नाहीत याची खात्री आल्यानेच हे विधेयक गोंधळात मंजूर करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मागील सरकारच्या काळात झालेले अनेक निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. मागील सरकारचा महत्वपूर्ण घेण्यात आलेल्या निर्णयापैकी हा एक महत्वपूर्ण निर्णय असून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता परंतु तो निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला होता. त्याला भाजपने विरोधही केला होता मात्र जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं.