Categories: Previos News

नको रं बाबा तसली मदत, फोटू काढून फेसबुकाव टाकत्यात



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीचा सर्वात जास्त फटका मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवणाऱ्यांना बसू लागला. देशाचे पंतप्रधान आणि राज्यातील नेत्यांनी आवाहन केल्यानंतर अनेक कंपन्या, उद्योगपती, दिग्गज या गरिबांना मदत करण्यासाठी सरसावले शासनाची मदतही जाहीर झाली आणि येथेच गाव पुढाऱ्यांची चंगळ झाली. प्रत्येक उद्योगपती आणि कंपनी चालकांना गावागावात जाऊन धान्य, मदत वाटप करणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्थानिकांवर सोपवली मात्र स्थानिकांनी याचा गैरफायदा घेत मदत आणि धान्यवाटप करताना फोटोशेषन करून ते फोटो फेसबुकवर टाकण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे ही मदत आम्हीच करत आहोत हे भासविण्याचा प्रयत्न सुरू झाला. घरगुती आर्थिक अडचण असल्याने धान्य आणि मदत घेणाऱ्यांवर स्वतःचे फोटो काढून देताना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येत होती मात्र नाईलाज असल्याने त्यांना हे करावे लागत होते. मात्र याला काहि ठिकानी अपवाद ही पाहायला मिळत होते, काहींनी सहा-सहा हजार पॅकेट गोरगरिबांना वाटताना गरजूंसोबत वाटप करताना एकही फोटो काढला जात नव्हता त्यामुळे ते व्हायरल करायची वेळच येत नव्हती. त्यामुळे अशी मदत अनेक गरजवंत आवर्जून घेत होते आणि आशिर्वादही देत होते.

आता पुन्हा चमकोरीला सुरुवात होऊन तोच कित्ता गिरविण्यास सुरुवात झाली आहे. मदत कुठलीही असो ती आलेली मदत गरजूंना वाटप करणारे लोक फोटो काढून ते मोठ्या प्रमाणावर फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून  व्हायरल करू लागले आहेत. याची धास्ती आता गरजूंनी इतकी घेतली आहे की नको बाबा त्यांची मदत, फोटू काढून फेसबुकाव टाकत्यात. आमचा पाव्हना रावळा काय म्हणल, असे म्हणत गरज असतानाही  आलेली मदत फक्त चमकोगिरी करणाऱ्या महाभागांमुळे नाकारू लागले आहेत त्यामुळे आता मदत करायची असेल तर ती गरजू लोकांना मदत करतानाचे फोटो न काढता करावी असा सूर निघू लागला आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago