केडगाव-बोरीपार्धी मध्ये पुन्हा ‛चारजण’ पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव जवळ असणाऱ्या बोरीपार्धी आणि चौफुला येथे चारजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.इरवाडकर यांनी ‛सहकारनामा’ ला दिली.

दौंड तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये कोरोनाने मोठ्याप्रमाणावर फैलाव करण्यास सुरुवात केली आहे. काल दि.शनिवारी 23 जणांचे swab टेस्ट पाठविण्यात आल्या होत्या त्यापैकी 19 जण निगेटिव्ह तर 4 जण पॉझिटिव्ह आले.