Categories: Previos News

मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सरकारने ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (सुमित सोनवणे)

महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ वणवण भटकत, उन, वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता तसेच. आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत, वीज पडून अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अनेक मेंढपाळांनी जीव गमावला आहे अशी संकट येत असताना माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही असा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा संकटाच्या काळात माणुसकी दाखवणे गरजेचे आहे परंतु काही  लोक मेंढपाळांवर सातत्याने अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकरण घडत आहेत. मेंढपाळांवर  होत असलेले हल्ले रोखले पाहिजेत महिलांना मारहाण, अमानुषपणे अत्याचार होत आहेत तसेच अनेक ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले, होत आहेत दिवसेंदिवस हल्ले करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे मेंढपाळांना ॲट्रॉसिटी सारखे संरक्षण मिळावे समाज कंटकांकडून होणारी अरेरावी, जातीवाचक शिवीगाळ, मेंढ्या चोरून नेणे, काही गावात स्थानिक लोकांकडून मेंढपाळ समाज बांधवांना मारहाण, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांनी आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर देखील कारवाई करावी.

असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीपान वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि दौंडचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना जरब बसेल असे शासन केले पाहिजे, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे तसेच मेंढपाळांच्या मुलांसाठी चालती शाळा सुरू करावी आशा मागण्या करण्यात आल्या आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago