हॉटेल ताज उडवून देण्याची पाकिस्तानातून आली फोनवर धमकी, सुरक्षेत वाढ



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

जग प्रसिद्ध असणारे मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांनी उडवून देण्याची धमकी दिली असून त्यामुळे हॉटेल ताजच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीचा फोन हा पाकिस्तानातून आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ANI ला दिली असून या धमकी नंतर ताज हॉटेल आणि जवळपासच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीचा फोन हा पाकिस्तानमधील काराचीतून आला असल्याचे नंबरवरून स्पष्ट झाले आहे. कालच पाकिस्तनामधील स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये दहाच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातहा हल्ला झाल्यानंतर मुंबईत धमकीचा फोन आल्याने याला गंभीरपणे घेण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही रिस्क नको म्हणून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.   सध्या मुंबई पोलीस आलेल्या फोन नंबरची संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.