Categories: Previos News

लोणीकाळभोर उपसरपंचपदी राजाराम काळभोर

थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

पुणे सोलापूर महामार्गावरील पुणे शहरालगतच्या मोठ्या लोकवस्तीचे गाव असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राजाराम विठ्ठल काळभोर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी.के.पवार यांनी दिली.

गावचे उपसरपंच राजेंद्र काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी गायकवाड होत्या तर सचिन म्हणून ग्रामविकास अधिकारी डी के पवार यांनी काम पाहिले. या बैठकीला माजी उपसरपंच योगेश काळभोर, आण्णासाहेब काळभोर सह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंच पदासाठी केवळ राजाराम काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच आश्विनी गायकवाड यांनी जाहीर केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हवेली तालुक्याचे जेष्ठ नेते माधवराव काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, शिवदास काळभोर, मनिष काळभोर  उपस्थित होते

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago