केडगाव, बोरीपार्धी’करांसाठी आनंदाची, तर पाटसकरांसाठी काहीशी चिंताजनक बातमी..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी येथील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून केडगाव, बोरीपार्धी येथील सर्व 31 जणांचे कोरोना रीपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. याबाबत दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रासगे आणि यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.

 केडगाव मधील मोहन जनरल हॉस्पिटल येथीलही सर्व डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ निगेटिव्ह आला आहे त्यामुळे केडगाव आणि बोरीपार्धीकरांमध्ये आनंद साजरा होत आहे. मात्र पाटस येथील नागरिकांसाठी थोडी चिंता वाढवणारी बातमी असून आज पाटसमधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आता पाटसमध्ये कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे