Categories: Previos News

महार वतनाच्या जागेतून रस्ता मंजुरी प्रकरण चिघळणार! दौंड वंचित बहुजन आघाडीचा आमरण उपोषणाचा इशारा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड तालुक्यातील वाळकी गावातील महार वतनाच्या जागेतून दौंड तहसीलने रस्ता कामाला मंजुरी दिल्याच्या या निर्णयाचा दौंड वंचित बहुजन आघाडीने निषेध नोंदवित आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या बाबत वंचितच्या वतीने तहसीलदार व दौंड  पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायत वाळकी (ता.दौंड) या ठिकाणी गावठाणा लगत महार वतनाच्या काही  जमीनी आहेत. येथील काही उच्च वर्णीय लोकांनी त्यांच्या शेतात व कार्यालयाकडे जाण्यासाठी या जमिनीतून रस्त्याची मागणी तत्कालीन तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे केली होती, तहसीलदारांना गाव पातळीवर रस्ता देण्याचे अधिकार आहेत त्यामुळे या अधिकाराचा वापर करून तत्कालीन तहसीलदार उत्तम दिघे यांनी सदर महार वतन जमिनीतून चक्क 35 फुटांचा रस्ता करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

35 फुटाच्या या रस्त्यामुळे महार वतनाच्या जमिनीपैकी पाऊण एकर क्षेत्र रस्त्यामध्ये जात आहे, तसेच याच जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असल्यामुळे हा खूप मोठा चुकीचा निर्णय दिघे यांनी दिला असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. जातीय द्वेषातून दलित समाजावर त्यांनी अन्याय केलेला आहे, त्यामुळे तत्कालीन तहसीलदार दिघे यांचा सदरील रस्त्याचा आदेश रद्द करावा व दिघे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत खटला दाखल करण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आली आहे.

याबाबत कारवाई होऊन न्याय मिळाला नाही तर दौंड तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच याच जागेत असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या स्मारकास जर तोडण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण राज्यात वेगळा संदेश जाईल आणि त्यातून अनर्थ घडेल त्यामुळे सदरील स्मारक हटविण्याचा विचार सोडून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

यावेळी तत्कालीन तहसीलदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अश्विन वाघमारे, अनिकेत मिसाळ, अक्षय शिक्रे, ऍड. किरण लोंढे, मयूर कांबळे, युवराज दामोदरे, प्रशांत भालेराव, रमेश तांबे तसेच सीमा गायकवाड आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago