आमदार राहुल कुल यांच्या सुचनेमुळे केडगाव-देशमुख मळा पुलाचे काम प्रगतीपथावर



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव-देशमुख मळा येथे अतिशय गरजेचा असणारा आणि केडगाव देशमुख मळ्याला जोडणारा कॅनल पुल देशमुखमळ्यातील आमदार राहुल कुल यांच्या सूचनेवरून आणि आमदार कुल यांचे सर्व कार्यकर्ते तसेच केडगाव ग्रामपंचायत सदस्या गजराबाई नागेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे येथील पुलाचे काम प्रगतीपथावर चालु झाले आहे अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर उर्फ चंद्रशेखर मोरे यांनी दिली.

देशमुख मळा आणि केडगावला जोडणाऱ्या या पुलामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात व इतर वेळेसही या ठिकाणावरून जाण्या येण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

आमदार कुल यांच्याकडे या पुलाबाबत येथील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आमदार कुल यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तातडीने या कामाबाबत सूचना केल्या होत्या व त्यामुळे हे काम लागलीच सुरू झाल्याने येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.