Categories: Previos News

अबब.. इतक्या मजुरांनी सोडले महाराष्ट्र, खुद्द शरद पवारांनी दिली माहिती



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन


सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे अनेकांनी आपल्या घरचा रस्ता  धरला आहे. या मजुरांना आप वहा क्या करोगे? असे विचारले तर वहा जाकर खेती करेंगे, अब लॉकडाऊन मे यहा रुकना मुश्किल है, असे अनेक मजूर बोलून दाखवत आहेत. त्यामुळे परराज्यातील कामगार, मजूर आणि इतर किरकोळ व्यवसाईकांनी स्थलांतर सुरू केले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती देताना सरकारकडून परतीची व्यवस्था केली जात असून यासाठी वेगवेळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालयात संपर्क केला असून आत्तापर्यंत ९३ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये तब्बल नुसत्या महाराष्ट्रातून 1 लाख 23 हजार 725 मजूर, कामगार व इतर छोटे मोठे व्यावसायिक त्यांच्या गावी परतले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी परतीच्या वाटेवर असताना मजूर, कामगारांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी ज्या गोष्टींची पूर्तता करावी लागते त्यामध्ये विविध परवानग्या, जाणाऱ्या लोकांची यादी तयार करून मग परवानगीची  प्रक्रिया पूर्ण केली जाते यासाठी त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करणे गरजेचे असतेच त्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी पूर्ण प्रयत्न करतातच पण थेटपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला तर या कामास गती मिळण्यास मदत होत असल्याचे शेवटी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago