दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊ लागली आहे. तालुक्यामधून दोन महामार्ग जात असून त्या पैकी शिरूर – सातारा या महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक हि चिंतेची बाब बनली आहे. तर पुणे सोलापूर महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवरून होणारी वाळू, माती, खडी आणि क्रशसँड च्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसांमध्ये रस्त्यांना पाणी आणि अवजड वाहतुकीमुळे मोठे नुकसान होत असते. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डे पडणे, रस्त्यांच्या साईडपट्ट्या उदसणे, रस्त्यांना भेगा पडून रस्ता खराब होणे असे प्रकार घडत आहेत.
अवजड वाहतुकीमध्ये सर्वात जास्त वाळूच्या गाड्या आणि स्टोन क्रशरवरून खडी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची ये जा होत असते. त्यामुळे या रस्त्यांचे जास्त नुकसान होत असून या अवजड वाहनांवर कारवाई केल्यास निश्चितच अवजड वाहतुकीला लगाम बसून रस्त्यांची होणारी झीज कमी होणार आहे आणि रस्ते वर्षानुवर्षे सुस्थितमध्ये राहून प्रवाश्यांना चांगली सेवा मिळेल यात शंका नाही.