Categories: Previos News

संक्रमित क्षेत्रातील कामगारांना द्यावे लागणार हमीपत्र



  थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

हवेलीतील कोरोनाच्या संक्रमण प्रभावित क्षेत्रातील कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या कामगारांना आपापल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये हमीपत्र देणे बंधनकारक असून त्याबद्दलचे आदेश हवेलीचे गटविकास अधिकारी शिर्के यांनी काढले आहेत.

हवेलीतील पूर्व भागातील थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कोरेगाव मूळ या गावात गेल्या चार दिवसात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून जवळपास बारा रुग्ण आढळून आले आहेत.परंतु नागरिकांना याची आणखी तिवृता जाणवत नाही असे दिसते आहे या प्रतिबंधीत क्षेत्रात नागरिकांनी मास्क वापरणे अपरिहार्य आहे तसेच कामानिमित्त गाव सोडून बाहेरगावी जावे लागत असेल तर ग्रामपंचायत कार्यालयात त्याबद्दल लेखी हमीपत्र देणे बंधनकारक केले असल्याचा आदेश गटविकास अधिकारी यांनी काढले आहेत. तसेच मास्क न घालणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना ग्रामसेवक यांना दिल्या आहेत.  या कोरोना प्रभावित क्षेत्रात थेऊरमध्ये पाच रुग्ण सापडले आहेत त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत आज थेऊर पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सर्व दुकानदारांना प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात सूचना दिल्या याची कडक अमलबजावणी करावी अन्यथा पोलिस कारवाई करण्यात येईल.सध्या थेऊरमध्ये सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी संपूर्ण गावात फिरुन सर्व दुकानदारांना सूचना दिल्या व नियमांचे पालन करण्यास सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

16 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago