थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
हवेलीतील कोरोनाच्या संक्रमण प्रभावित क्षेत्रातील कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या कामगारांना आपापल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये हमीपत्र देणे बंधनकारक असून त्याबद्दलचे आदेश हवेलीचे गटविकास अधिकारी शिर्के यांनी काढले आहेत.
हवेलीतील पूर्व भागातील थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कोरेगाव मूळ या गावात गेल्या चार दिवसात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून जवळपास बारा रुग्ण आढळून आले आहेत.परंतु नागरिकांना याची आणखी तिवृता जाणवत नाही असे दिसते आहे या प्रतिबंधीत क्षेत्रात नागरिकांनी मास्क वापरणे अपरिहार्य आहे तसेच कामानिमित्त गाव सोडून बाहेरगावी जावे लागत असेल तर ग्रामपंचायत कार्यालयात त्याबद्दल लेखी हमीपत्र देणे बंधनकारक केले असल्याचा आदेश गटविकास अधिकारी यांनी काढले आहेत. तसेच मास्क न घालणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. या कोरोना प्रभावित क्षेत्रात थेऊरमध्ये पाच रुग्ण सापडले आहेत त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत आज थेऊर पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सर्व दुकानदारांना प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात सूचना दिल्या याची कडक अमलबजावणी करावी अन्यथा पोलिस कारवाई करण्यात येईल.सध्या थेऊरमध्ये सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे.
ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी संपूर्ण गावात फिरुन सर्व दुकानदारांना सूचना दिल्या व नियमांचे पालन करण्यास सांगितले.