Categories: Previos News

लाॅकडाऊनच्या काळात लाल गाडीचा धसका



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
संपूर्ण देशात लाॅकडाऊन केल्यानंतर नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पहिली जबाबदारी येऊन पडते ती पोलिसावर यात थोडी समजूत काढून तर कधी प्रसाद देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्यानंतर पोलिस आपले काम चोख बजावत आहेत.परंतु लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या थेऊर पोलिस मदत केंद्रात येत असलेल्या गावात नागरिकांनी धसका घेतला तो लाल गाडीचा.
थेऊर पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी थेऊर सह कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, आळंदी म्हातोबा, तरडे या गावात नागरिकांना संचारबंदी काळात शिस्त लावण्यासाठी वेगवेगळे पवित्रे अवलंबिले.यात त्यांना त्यांचे सहकारी नितीन सुद्रीक गणेश कर्चे आदींचे सहकार्य आहे.त्यांनी अगोदर गावातील नागरिकांशी संवाद साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तरीही अनेक मोकाट टवाळखोर विनाकारण रस्त्यावर उतरून फिरत होतो त्यांना त्याच्या भाषेत समजावले म्हणून या गावचा पॅटर्न तयार झाला हाच पॅटर्न इतर ठिकाणी अमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांची लाल रंगाची गाडी दुरुन दिसली तरीही प्रत्येक जण आपापल्या घरातच बसून राहतो.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी लाॅकडाऊनच्या काळात जवळपास चाळीस ते पंन्नास दुचाकी केली त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर येताना पोलिस अडवणार तर नाही ना याची धास्ती घेत आहेत. कांबळे यांची लाल रंगाची चारचाकी गाडी दिसताक्षणी सर्व परिसर शांत होतो.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago