केडगाव-बोरीपारधीकरांना दुसरा धक्का : केडगाव-बोरीपारधी मध्ये पुन्हा एक ‛कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, एका दिवसात दोघांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपारधी येथे आज पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून त्यामुळे एकाच दिवसात केडगाव परिसरात कोरोना बधितांचा आकडा दोनवर गेला आहे. याबाबतची अधिकृत माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी बोलताना दिली.

सापडलेला कोरोना रुग्ण हा व्यवसायाने रिक्षा चालक असल्याची माहिती मिळत असून तो चौफुला-केडगाव या बोरीपारधी गावाच्या हद्दीत वास्तव्यास आहे. 

आज दुपारी केडगाव मधील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यामुळे केडगावमधील नागरिकांमध्ये चिंता वाढली होती मात्र आता पुन्हा अजून एक रुग्ण आढळल्याने आता केडगाव-बोरीपारधी मधील नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे व दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी नागरिकांनी मास्क वापरावे, साबणाने हाथ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले असून गर्दीच्या ठिकाणे टाळावीत असा सल्ला दिला आहे