Categories: Previos News

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची राज्य शासना विरोधात दीक्षाभूमी ते वर्षा बंगला रॅली : गौतम कांबळे



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

राज्य शासनातील आरक्षण विरोधी अधिकारी गट सातत्याने वेळोवेळी पदोन्नती मधील आरक्षण विरोधात षडयंत्र करीत आहेत, त्यामुळे हजारो मागास वर्गीय अधिकारी, कर्मचारी पदोन्नती पासून वंचित आहेत आणि हजारो कर्मचारी विना पदोन्नती सेवानिवृत्त सुद्धा झाले आहेत  असा आरोप महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने करण्यात  आला आहे. 

या अन्याया विरोधात महासंघाने शासनाविरोधात संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. अन्यायाला वाचा फुटावी व महासंघाचा आवाज सरकार पर्यंत पोहोचावा या उद्देशाने कास्ट्राईब संघ शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी दौंड  येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मागासवर्गीयांच्या व्यथा मांडल्या व संघाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य  झाल्या नाही तर  शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सरकार अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, भटक्या, इतर मागास व अल्पसंख्यांक समाजाला पूर्णपणे फसवत असून बढती मधील आरक्षणाबाबत कोर्टात तुमची बाजू मांडली जात आहे असे फक्त भासवीत आहे. सरकार दरबारी मागासवर्गीयांची दखल घेण्यास कोणाकडेही  वेळ नाही, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा तर कधीच फोन लागत नाही. त्यांच्या आठ PA शी संपर्क साधला असता फक्त साहेब बाहेर गेले आहेत हेच उत्तर आत्तापर्यंत मिळाले आहे. 

सामाजिक न्याय मंत्र्यांकडून मागासवर्गीयांना न्याय मिळूनये हे दुर्दैव आहे, आणि  म्हणूनच महा संघाच्या वतीने आरक्षण बचाव लढा आंदोलन तीव्र करणार आहोत असेही गौतम कांबळे म्हणाले. 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर  या कालावधीमध्ये दीक्षाभूमी (नागपूर) ते वर्षा बंगला, मुख्यमंत्री निवास, मुंबई अशी रॅली आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये जवळपास दीड लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचे गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे, महाराष्ट्रातील चार लाखाच्या वर असलेला रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय देण्यात यावा अशा काही महत्वपूर्ण मागण्या महासंघाच्या वतीने शासनाला करण्यात आल्या आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

7 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

8 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

10 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

17 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago