लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाईन(महेश फलटणकर)
कोरोना विषाणुच्या संसार्गामुळे अनेक व्यवसाय उद्योग बंद करण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू सेवा पुरवणारे व्यवसायिक आपले काम तत्परता दाखवत प्रामाणिकपणे पाडत असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवामध्ये घरगुती गॅस देखील महत्वाचा भाग असल्याने लोणी काळभोर येथील पाषाणकर गॅस एजन्सीकडुन लॉकडाऊन मध्ये तत्पर सेवा देण्याचे काम केले जात आहे. ग्राहकांना वितरण व्यवस्थेकडुन घरपोच सेवा पुरवली जात असुन दररोज ६५० गॅस सिलिंडरचे वाटप घरपोच केले जात आहे. गॅस वितरण करण्यासाठी १६ डिलीव्हरी बॉय काम करत आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून गॅसचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेत सेवा मिळत आहे. त्याचबरोबर वितरण विभागाकडून ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाईन बुकींग, तसेच गॅसची रक्कम देखील ऑनलाइन घेतली जात आहे. शासन-प्रशासनाच्या सूचनेनुसार घरपोच सेवा करताना कर्मचारी वर्गाकडुन आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.