परप्रांतीय कामगार रस्त्यावर उतरत झाले आक्रमक, पोलिसांनी घेतले अनेकांना ताब्यात



सुरत : वृत्तसंस्था

देशामध्ये लॉकडाऊन आदेश पारित झाल्यानंतर अनेकांना  आहे तेथेच थांबावे लागले आहे. यात परप्रांतीय मजुरांचा मात्र आता सय्यम संपत असल्याचे दिसत असून या ना त्या तऱ्हेने ते आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. असाच परप्रांतीय मजुरांच्या उद्रेकाचा प्रकार गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात असणाऱ्या मोरा गावात घडला असून परप्रांतीय मजूरांनी मोठी गर्दी करत आपल्या गावी परत जाण्याची मागणी केली आहे याबाबत चे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मिळालेल्या अधीक माहितीनुसार पोलीस ठाण्याजवळ  जमलेल्या अनेक   कामगारांनी दगडफेक करण्यास सुरुवात करून त्या परिसरातील असणाऱ्या वाहनांची नासधुसही केली आहे. हा उद्रेक शमत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्वरित अधिक कुमक मागवत यातील अनेक कामगारांना ताब्यात घेतले आहे. यातील अनेक कामगार बिहार, ओडीसा, उत्तर प्रदेश या राज्यांतील असल्याचे समजत आहे. प्रशासनाने आमची आम्हाला घरी जाण्यासाठी आमची सोय करावी अशी मागणी हे कामगार करत असल्याचे समोर येत असून काँग्रेसच्या गुजरातमधील स्थानिक नेत्यांनी या सर्व प्रकारावरून राज्य व केंद्रातील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परप्रांतीय कामगारांचा मुद्दा मार्गी लावण्यात केंद्र सरकारला यश येत नसल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहेत.