Categories: Previos News

शेतकरी, कार्यकर्त्यांनी जुन्या संदेश वाहकामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले रक्ताने माखलेले पत्र



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

महायूतीने पुकारलेल्या दूध बंद यल्गार आंदोलनाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना येेेथील शेतकऱ्यांनी विशेष पद्धतीने पत्र पाठवले आहे.

शेतकऱ्यांच्या दुधाला दहा रुपये प्रति लिटर अनुदान मिळावे, दुध भूकटी निर्यातीस पन्नास रुपये अनुदान मिळावे. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

गेली चार महिने झाले दुधाला राज्यभर पाण्यापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे.

त्यामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसह भाजप, रयत क्रांती संघटना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने रक्ताने लिहिलेले पत्र कबुतराच्या गळ्यात बांधून ते मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 

प्राचीन काळात संदेशवहनाचे काम कबुतरांच्या मार्फत केले जात होते आता त्याच संदेश वाहकाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याने ते आतातरी याची दखल घेतली असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

अद्यापही शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीची योग्य अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या  सहित रक्ताने लिहिलेले पत्र कबुतरांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना पाठवलेले आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते माऊली शेळके, कुंभार, गवळी, माने, कोऱ्हाळे आदी शेतकरी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago