ट्रेन सुरू होण्याबाबत पसरवलेल्या ‛अफवेची’ चौकशी होऊन कारवाई होणार – गृहमंत्री अनिल देशमुख



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

मुंबईमध्ये झालेल्या कामगार, मजदूरांच्या गोंधळानंतर आता नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. इतके लोक अचानक बाहेर कसे पडले? आणि ते वांद्रे स्टेशनला का आले? ट्रेन सुरू होणार ही अफवा पसरल्यानंतर हा सर्व प्रकार घडला! असण्याची शक्यता असल्यामुळे  आता याबाबतची चौकशीचे होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.



 मुंबईत जमलेल्या जमावबाबत आता काही गोष्टी उघड होऊ लागल्या असून लॉकडाउन असले तरीही ट्रेन सुरु होतील अफवा या प्रकाराला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात असून या अफवेमुळेच सगळा जमाव जमला होता. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना  लाठीमारही करावा लागला. 

 आता या प्रकरणी ज्या कुणी अफवा पसरवली असेल त्याची चौकशी होऊन कारवाई होणार आहे असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.