दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपारधी येथे एका सोसायटीमध्ये असणाऱ्या 13 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत असून या बाळाची प्रायव्हेट लॅबमध्ये केलेली कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्याची माहिती बोरीपारधी चे उपसरपंच सुनील सोडनवर यांनी दिली आहे.सध्या ही सोसायटी सील करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र त्या बाळाची पुन्हा एकदा सरकारी लॅबमध्ये टेस्ट करून नंतर त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या 13 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे त्या बाळाच्या घरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह हिस्ट्री असून त्यामुळे हे बाळ त्याच्या मावशीकडे ठेवण्यात आले होते. अगोदर या बाळाची झालेली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येत असून नंतर मात्र या बाळाची झालेली टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. सरकारी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या टेस्टनंतरच आता याबाबत माहिती मिळेल असे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.