दौंडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडला : या रुग्णालयात उपचार सुरू, दौंडचे आमदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

आत्तापर्यंत कोरोनापासून बचावलेल्या दौंड तालुक्यात आज पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे. हा रुग्ण दौंडच्या ग्रामीण भागातील दहिटने गावात सापडला असून त्याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दौंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली.

कोरोना बाधित रुग्णाचे वय ६० वर्षे असून त्यास सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. आज बुधवार दि.२९ एप्रिल रोजी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दौंडचे आमदार राहुल कुल आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी केले आहे.