देवा अजित दादांना लवकर बरे कर… ‛सासरे अजित दादांसाठी’ दौंडच्या ‛आमदार जावयांचे’ देवाला साकडे



पुणे : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त सर्वप्रथम  ‛सहकारनामा’वर प्रसिद्ध झाल्यांनंतर तालुका आणि जिल्ह्यातून अजितदादा लवकर बरे व्हावेत म्हणून सोशल मीडियावर पोस्ट पडत आहेत, मात्र या सर्व पोस्टमध्ये यातील एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून हि पोस्ट दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी अजित दादांसाठी केली आहे.

दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी आपल्या पोस्टमध्ये… राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा मा.ना.अजितदादा पवार साहेबांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कळाले. राज्यातील गोरगरीब जनतेचे आशिर्वाद दादांच्या पाठीशी आहेत, अजितदादा लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत कार्यरत व्हावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे अशा आशयाची पोस्ट केली आहे.

या पोस्टला सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद लाभत आहे. दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाचे जावई आहेत. राहुलदादांनी अजितदादा बरे व्हावेत यासाठी देवाला साकडे घातले आहे. आज अजितदादांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार कुल यांसह तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही अजितदादा बरे व्हावेत म्हणून कुल यांच्या पोस्टला लाईक करून कमेंट केल्या आहेत.