तालुक्यात ऑक्सिजन, रेमिडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढवा : आ.राहुल कुल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी



| सहकारनामा |

पुणे : दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता येथे आता ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर बेड ची अधिक प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे नेमकी हिच अडचण लक्षात घेऊन आज दौंड चे आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावासंदर्भात चर्चा केली. यावेळी डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयांशी समन्वय साधून ऑक्सिजन व रेमिडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी तसेच ऑक्सिजन , व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढवावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

सध्या तालुक्यामध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडत असून त्यातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे मात्र तरीही अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड कमी पडत असून आज आ.कुल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.