‛काय सांगशील ज्ञानदा’वरून रुपाली चाकणकर भडकल्या, ट्रोलर्सना दिला हा ‛इशारा’



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

एका वृत्तवाहिणीच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या नावाने सोशल मीडियावर ‘काय सांगशील ज्ञानदा’ असा हॅशटॅग वापरून लोक विविध प्रश्न विचारत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्रोलर्सला चांगलेच फैलावर घेतले असून एकदा आपल्या आई किंवा बहिणीलाही असे ट्रोल करून पहा असा इशारा देत ज्ञानदा काय  तुमच्या घरात काम करते का रे,  ज्ञानदा तुमच्याकडे कामाल आहे का रे, अशा कडक शब्दात चाकणकर यांनी ज्ञानदाला ट्रोल करणाऱ्यांना फैलावर घेतले आहे. पुढे बोलताना त्यांनी ज्ञानदा चा वृत्तनिवेदिकेचा प्रवास हा सोपा नसून तिने त्यासाठी शंभरदा अभ्यास केलाय. मुळात तिला नेमकं का ट्रोल केलं जातंय? तिचं काय चुकलंय? समाज शिकला पण समाज सुशिक्षित झाला नाही? कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महिला आपल्या हिम्मतीवर पुढे आहेत हे समाजाला पचत नाही का, तुमचं दुखणं काय आहे, याचाच मला प्रश्न पडत असून  ज्ञानदाला ट्रोल करणाऱ्यांनी व्यवस्थित स्वत:ची मानसिकता समजून घ्यावी आणि गांभीर्याने विचार करावा, असं म्हणत ज्ञानदाच्या मी सोबत आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे. तर ‛काय सांगशील ज्ञानदा’ हा  ट्रेंड फेसबुक पेजवर चालविणाऱ्यांनी या पेजवरून आम्हाला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, ज्ञानदा ताई या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. त्यांचा संघर्ष आम्हाला माहिती आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी प्रेरणा म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केल्याची पोस्ट करण्यात आली आहे. 

पहा व्हिडिओ