Categories: Previos News

उसाचे गुऱ्हाळ चोरणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी) 

लोणी काळभोर स्टेशन परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक ऊसाचा रस काढण्याचे गुर्हाळ चोरले याबद्दलची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली यावर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांना या गुन्ह्या संदर्भात तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. 

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी नगर, कदमवाकवस्ती परिसरात राहणारे हरिश्चंद्र फडतरे यांची ऊसाचा रस काढण्याची मशिन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरली होती. याबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती. चोरट्यांनी चोरी करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणणे जिकीरीचे बनले होते. परंतु पोलिसांनी  संशयास्पद मोटारसायकलचे नंबरवरून त्यांचा पत्ता शोधून फेसबुक वरील अकाउंटच्या फोटोचा आधार घेत बोरी भडक ता. दौंड येथील कमलेश संजय काळे व अरुण चिरंजीव प्रजापती यांना ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीस गेलेली ऊसाचा रस काढण्याची मशिन व एक टाटा कंपनीचा मालवाहतून छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 5 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, समीर शेख, पोलिस नाईक विजय गाले, पोलिस शिपाई सागर कडू, रोहिदास पारखे यांनी सहभाग घेतला.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago