नाभीक कारागीरांना मदत करण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांना निवेदन



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लाॅकडाऊन नंतर जवळपास तीन महिने सर्व व्यवहार बंद होते परंतु यात अनेक प्रकारे शिथिलता दिली गेली परंतु सलून व्यवसायाला आजपर्यंत सुट दिली नाही यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्या नाभीक समाजावर मोठा अन्याय होत आहे म्हणून हवेली तालुका नाभीक समाजाच्या वतीने शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. 

लाॅकडाऊनच्या काळात सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे तर यातील अनेक व्यवसायीकांची दुकाने भाड्याची आहेत त्यामुळे सगळे बांधव अडचणीत सापडले आहेत.

या निवेदनात नाभीक समाजाच्या कारागीरांना प्रति महिना किमान दहा हजार रुपये अनुदान मिळावे तसेच शासकीय नियमानुसार दुकान उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. खासदारांच्या वतीने हे निवेदन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी स्विकारले.यावेळी हवेली तालुका नाभीक संघटनेचे अध्यक्ष निलेश कोकरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रायकर, चेतन उल्हाळकर, विशाल तावरे, दत्ता गायकवाड, प्रविण ताटे, गणेश पंडीत, गोरक्ष करेकर आदी सभासद उपस्थित होते