Categories: Previos News

‛कोरोना’मुळे ‛बारामतीमध्ये’ पत्नीचा पतीवर ‛विळ्या’ ने हल्ला, सासुलाही मारहाण

पुणे : सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)

– ‛कोरोना’विषाणूमुळे राज्यात  हा हा’कार माजला असताना आता याचा परिणाम कौटुंबिक गृह कलहात जाणवू लागला आहे. बारामती शहारामध्ये कोरोनामुळे अशीच एक घटना घडली असून पत्नीने चक्की पतीवरच शेतात वापरल्या जाणाऱ्या विळ्याने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी पतीने पत्नीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २६ मार्च रोजी

सकाळी ११:३० च्या सुमारास फिर्यादी पतीच्या आंबेडकर वसाहत आमराई, ता.बारामती येथील घरासमोरील रोडवर तो उभा असताना त्याची पत्नी हिला तु पुणे-पिंपरी येथे गेली होती तु तेथुन परत आली असुन कोरोना विषाणुच्या अनुशंगाने तु मेडीकल चेकअप कर असे म्हणाला असता पत्नीने चिडुन जावुन पतीच्या अंगावर धावून जात अगोदर हाताने मारहाण केली आणि नंतर घरासमोर असलेला लोखंडी विळा हातात घेउन पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी सासूने मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून भांडण सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिलाही पत्नीकडून  मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कोरोनामुळे आता गृहकलह वाढल्याचे समोर येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago