दौंड शहरामध्ये पुन्हा ‛दोघांना’ कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने आपले जाळे पसरवताना अगोदर दौंड शहरामध्ये आपले प्रस्थ स्थापन केले होते त्यामुळे दौंड शहर हे कोरोनाच्या कचाट्यातून लवकर  सुटावे असे अनेकजण प्रार्थना करत असतानाच पुन्हा दोघांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डांगे यांनी सहकारनामाला दिली आहे.

कोरोना झालेल्यांमध्ये एका 44 वर्षीय महिला आणि 75 वर्षीय वृद्धाचा समावेश असून महिला तुकाई नगर परिसरातील असून वृद्ध हे पानसरे वस्ती येथील रहिवासी आहेत. या दोघांवरही सध्या दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.डांगे यांनी दिली