corona : भांडगावमध्ये ‛दोघांना’ कोरोनाची लागण, दोन्ही कामगार प्रसिद्ध कंपनीत कामाला असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील मिनी औदयोगिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या भांडगावमध्ये पुन्हा 2 तरुणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  हे दोन्ही तरुण येथे असणाऱ्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये कामाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून भांडगाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून येथे बॅनर लावण्यात आले आहेत.

याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी माहिती दिली असून दोन्ही तरुणांपैकी एकाचा अहवाल प्रायव्हेट लॅबमध्ये तर दुसऱ्याचा  कोरोना अहवाल हा सरकारी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

भांडगाव हे मिनी औद्यीगिक क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते. भांडगावमध्ये अनेक वर्षांपासून मोठ मोठ्या कंपन्या येऊन वसल्या आहेत. येथील कंपन्यांमध्ये शेकडो स्थानिक कामगार काम करतात मात्र या कंपन्यांमध्ये काम करणारे  कामगारच कोरोना बाधित होऊ लागल्याने येथील अनेक कामगारांच्या चिंतेत भर पडली आहे.