Categories: Previos News

दौंडमध्ये शिवसैनिकांच्या अन्नछत्रात गरजूंना मिळतेय पोटभर जेवण अण मोलाचा आधार

दौंड : ( अख्तर काझी)

शिवजयंती( अक्षय तृतीया) च्या निमित्ताने शिवसेना दौंड विधानसभा नेते अनिल सोनवणे यांच्या पुढाकाराने व शिवसैनिक  राजेंद्र खटी, संतोष जगताप, नामदेव  राहिंज यांच्या विशेष सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्र उपक्रमात शहरातील गरजूंना पोटभर जेवण मिळत आहे, रोज साधारणतः दीडशे गरजू अन्नछत्रा चा लाभ घेत आहेत. कोरोना मुळे प्रशासनाने सर्वत्र लॉक डाऊन लागू केला आहे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता शहरातील सर्वच व्यवहार बंद आहेत. या परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगार गेले, हातावर पोट असणाऱ्यांची तर एक वेळ च्या जेवणाची पंचाईत झाली. अशा गरजूंच्या पोटाची व्यवस्था शिवसैनिकांनी अन्नछत्रा च्या माध्यमातून पूर्ण केली आहे. शिवसैनिकांच्या या अन्नछत्रास शहरातील दानशूर व्यक्तींनीही मदतीचा हात दिला आहे, ज्यामुळे दिनांक 13 एप्रिल पासून सुरू असलेला हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, ब्राह्मण सेवा संघ, मारवाडी सर, प्रवीण काळे, अनिल जांभळे आदींनी अन्नछत्र उपक्रमास आर्थिक मदत केली आहे.

उपक्रमाचे आयोजन अमोल जगताप, संदीप बारटक्के, शैलेश पिल्ले, राकेश भोसले यांनी केले असून धनंजय ताठे, विशाल मदने, सोनू बलाढे, दुर्गा सुरवसे यांचे सहकार्य लाभत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago