मुंबई : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)
रमजानचा पवित्र महिना उद्यापासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. एखाद्यास हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला मशिदी जाण्याची परवानगी आहे की नाही? मशिदीत नमाज होईल की नाही? तर याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी ट्विट करून दिले असून अजान मस्जिद मधून पुकारण्यात येईल मात्र नमाज ही प्रत्येकाने घरातच पढायची (पठण) करायची आहे असे सांगितले आहे. अजान म्हणजे नमाज पठणाच्या अगोदर स्पीकरमधून लोकांना नमाजची वेळ झाली आहे असे सूचित करण्यात येते त्यास अजान म्हणतात. त्या नंतर नमाज पठण केले जाते. परंतु यावेळी कोरोना संकट उभे ठाकले असून लॉकडाऊन दरम्यान, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. त्यामुळे मस्जिद मधून नमाजच्या वेळी फक्त अजान (पुकारली) दिली जाईल मात्र नमाज ही घरातच होईल असे ट्विट गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटरवरून केले आहे.
त्यामुळे हा नियम सर्व मुस्लिम बांधव पाळणार असून नमाज घरातच पठण केली जाणार आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुस्लिम बांधवांना खास हिंदी शैलीत शुभेच्छाही दिल्या आहेत.