दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
लग्नकार्यात वाजंत्री वाजविणारे बँडवाले तसेच पोतराज, जागरण गोंधळ कार्यक्रमातील गोंधळी यांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी दौंड रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पक्षाच्या वतीने दौंडचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सन मार्च 2020 पासून सर्वत्रच वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्वच क्षेत्रातील लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच हातावर पोट असणाऱ्या लोकांवर तर उपासमारीची कुऱ्हाडच कोसळली आहे. दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी अनिल साळवे, आनंद बगाडे, प्रकाश सोनवणे, दत्तू घोडे, विजय जाधव, तानाजी जाधव, आकाश तूपसौंदर्य, सखाराम तूपसौंदर्य, भाऊसाहेब जाधव, प्रवीण गरुडकर, राजू गरुडकर, राजू गायकवाड, मल्हारी जाधव आदी उपस्थित होते