यवत, केडगावकरांना मिळाला आज कोरोनापासून दिलासा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोना आपले जाळे पसरवत असताना कधी कधी समाधानकारक माहितीही पुढे येत असते. आजही तशीच काहीशी बातमी पुढे येत असून 61 जणांपैकी फक्त 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आज वरील गावांना थोडे समाधान मिळाले आहे.

आज यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत 1, केडगाव 1, जावजीबुवाची वाडी 1, भांडगाव 1, भरतगाव 1 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली असून यात 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे वयोमान हे 25 ते 57 वर्षांच्या दरम्यान आहे.