Categories: Previos News

Political – पराभूत होऊनही फेरी काढत ‛या’ उमेदवाराने मानले सर्वांचे आभार



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायतीची निवडणूक हि अटीतटीची झाली हे सर्वश्रुत आहे. या निवडणुकीत नविन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्कंठा वाढली होती मात्र या निकडणुकीत अनेक नवीन चेहरे पराभूत झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. 

मात्र काही नवीन चेहऱ्यांनी आपली उमेद सोडली नसून “जिंदगिकी यही रीत है, हार के बाद हि जित है”.. असे म्हणत आपल्या वार्डमधून फेरी काढून सर्वच मतदारांच्या घरी जात आभार मानल्याने अनेक मतदारांना गहिवरून आल्याचे पाहायला मिळाले.

यवतच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये हे घडलं असून निवडणुक कार्यक्रम लागल्यापासूनच हा वॉर्ड अनेक कारणांनी खूप चर्चेत राहिला होता. या वॉर्डमध्ये 400 नावांवर हरकतीही घेण्यात आल्या होत्या कारण मागील निवडणुकीत या वार्डमध्ये 2250 मतदार होते आणि या वेळेस त्यामध्ये मोठी वाढ होऊन 2978 मतदार संख्या झाली होती. त्यामुळे या वार्डमध्ये 400 जणांची नावे ही बाहेर गावची आहेत अशी हरकत तहसीलदार आणि सर्कल यांच्याकडे घेण्यात आली होती.

या वार्डमध्ये काळभैरवनाथ पॅनेलमधून  विशाल दिलीप भोसले, अनिस बाबूभाई मुलाणी यांच्या विरोधात समीर दोरगे, इमरान तांबोळी हे तुल्यबळ उमेदवार उभे होते. (काळभैरवनाथ पॅनेलच्या तिसऱ्या उमेदवार सौ. मंगल खेडेकर यामध्ये निवडून आल्या आहेत) या वार्डमध्ये खरी लढत हि समीर दोरगे आणि विशाल भोसले या उमेदवारांमध्ये होती. कारण दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ होते त्यामुळे या वार्डमध्ये काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत विशाल भोसले यांचा समीर दोरगे यांच्याकडून निसटता पराभव झाला, मात्र विशाल भोसले यांनी हार न मानता आज वार्डमध्ये फेरी काढून सर्वच मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले आणि आपण फक्त निवडणुकीपूरतेच लोकांच्या संपर्कात राहणार नसून कायम त्यांच्या सहवासात राहणार असल्याचा संदेश दिला आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

11 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago