दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर ५६ पोलिसांसह २०० जखमी



नवी दिल्ली : वृत्तसंस्था

– मागील दोन दिवसात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ पोलिसांसह २०० जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिंसाचार झालेल्या काही भागामध्ये मात्र परिस्थिती सुधारत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दिल्लीतील बाबारपूर, गोकुळपुरी आणि जाफराबाद येथील ये-जा बंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी

मंगळवारी रात्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्या भागात आले होते. कारमधून त्यांनी यमुना विहार, भजनपुरा, सिलमपूर, मौजपूर, या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वरिष्ठ अधिकान्यांसोबत बैठक घेतली. जवाहरलाल नेहरू स्टूडेंट्स युनियन (JNUSU) चे विद्यार्थी आणि नागरी हक्क समूहाचे लोकांनी दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

यांच्या निवासस्थानाबाहेर धरणावर बसले आहेत. दिल्लीतील हिंसाचाराबाबत बैठक आयोजित केली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. ईशान्य दिल्लीत पोलिसांनी दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या हिंसक निदर्शनात ५६ पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त चार भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ईशान्य दिल्लीमध्ये सर्व शाळा बंद, बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत तर उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.

सिसोदिया यांनी सी.बी एस.ईला बुधवारी होणारी

बोर्ड परीक्षा थांबवण्याची विनंती केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या २४ तासांत तिसरी प्रमुख बैठक घेतली आहे. नवनियुक्त दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस. एन. श्रीवास्तवही या बैठकीत होते. गृह मंत्रालयाने परिस्थिती लक्षात घेता प्रभावित भागात दिल्ली पोलिसांसह सीमा सशस्त्र बल (SSB) आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे जवान तैनात केले आहेत.