दौंड : सहकारनामा ऑनलाइन.
दौंड तालुक्यासाठी मान्यता मिळालेले स्वतंत्र उपविभागीय कार्यालय (प्रांत कार्यालय) तातडीने सुरु करण्यात यावे यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज मंगळवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनानंतर आ.कुल यांनी माहिती देताना दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचनेनुसार मान्यता मिळाली असून, त्यासाठी राजपत्र अधिसूचनेच्या संदर्भ क्र. २ नुसार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. माझ्या माहितीनुसार एकही आक्षेप व हरकत मा. विभागीय आयुक्त, महसूल विभाग पुणे यांना प्राप्त झाली नसून दौंडसाठी स्वतंत्र कार्यालय त्वरित सुरु करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करावे अशी मागणी महसूलमंत्री यांना केली असून तसे त्यांना निवेदन दिले असल्याचे कुल यांनी सांगितले.