सावधान! दौंडमध्ये ‛कोरोनाचा’ इफेक्ट वाढू लागला, पुन्हा ‛सात’जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपले पाय पसरवताना बोटावर मोजण्याइतके तालुके फक्त कोरोनापासून बचावले होते त्यातच एक नाव होते ते दौंड तालुक्याचे मात्र आता कोरोनाने या ना त्या मार्गाने दौंडमध्येही प्रवेश केला असून आज आलेल्या नवीन माहितीनुसार तब्बल सात नवीन रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे आता दौंड तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे ही काळाची गरज बनली आहे. 

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरात असणाऱ्या  एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली तर राज्य राखीव दलातील तीन जवान  कोरोना बाधित असल्याचा अहवाल समोर आला आहे त्यामुळे एकाच दिवसात 7 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दौंडकरांच्या चिंतेत भर पडली आहे