नगरपालिका हद्दीतील दुकानांनाही ग्रामीण भागातील दुकानांसारखे नियम लागू करून दुकाने खुली करावी : आमदार कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

राज्यात अनेक ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिका असून, त्यांची भौगोलिक रचना हि मोठ्या ग्रामपंचायत सारखी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यापासून या सर्व नगरपालिका हद्दीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. नगरपालिका हद्दीच्या लगत असलेली ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यामुळे नगरपालिका हद्दीतील नागरिक ग्रामपंचायत हद्दीमध्ये जावून खरेदी करत आहेत. 



त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनावश्यक गर्दी होत आहे तेव्हा नगरपालिका हद्दीतील दुकानांना ग्रामीण भागात लागू असलेले नियम लागू करून दुकाने खुली करण्यास परवानगी दयावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधीपक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा. अजितदादा पवार साहेब  यांचे पत्राद्वारे  केली. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे सदर बाब हि नगर विकास खात्याकडे पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात आली असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होऊन नगरपालिका हद्दीतील सर्व व्यापारी बंधूंना दिलासा मिळेल अशी आशा करतो.