मराठा आरक्षणासाठी पवारांनी सुचवला ‛अध्यादेशाचा’ मार्ग



नवी दिल्ली – 

सध्या राज्यात काही प्रकरणे सर्वात जास्त गाजत आहेत त्यात आता मराठा आरक्षणाची भर पडली असून यावर सर्वात चांगला उपाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सुचवला आहे.

शरद पवारांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणावरून आता वाद विवाद आणि आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा यावर अध्यादेश काढला तर सर्वोत्तम राहील असे आपले मत मांडले. आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी कोर्टात जे वकील दिले ते ख्यातनाम आणि मुरब्बी होते त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यसरकार असा वाद घालत बसण्यापेक्षा याबाबत अध्यादेश काढला तर नक्कीच मराठा समाजाला याचा फायदा होईल असे मला वाटते असे बोलून याबाबत मला कायदेशीर बाजू माहीत नाही मात्र त्याबाबतचा मार्ग निघाला तर नक्कीच याचा फायदा मराठा समाजाला होऊन कुणी रस्त्यावर उतरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शरद पवार यांनी देशातील अन्य राज्यांमध्ये आरक्षण दिले गेले मग महाराष्ट्रा राज्यात त्याबाबत मागणी झाली त्यामध्ये काही गैर होते असे मला वाटत नाही असे म्हणून विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते यात सरकार कमी पडले असे म्हणत आहेत कमतरता सांगतात पण हा प्रश्न न्यायालयाकडून सुटणार असल्याने विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. त्यामुळे  आम्ही पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी कोर्टात जाणार असे त्यांनी आवर्जून सांगितले.