| सहकारनामा | अब्बास शेख |
दौंड : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असला तरी त्याला पायबंद घालणाऱ्या व्यक्तीही (rahul kool) तितक्याच महत्वाच्या ठरत आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर आपले जाळे विणल्याने अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर अजूनही पाहायला मिळत आहे.
मात्र तालुक्याच्या प्रमुख व्यक्ती ने (rahul kool) योग्य नियोजन आणि कोविड सेंटर, रुग्णांना लागणारी गरजेची औषधे, वस्तू वेळेवर मिळाली तर अनेकांचे प्राण वाचतात आणि तो तालुका अन्य तालुक्यांसाठी कसा रोल मॉडेल ठरतो हे पुढील किस्सा वाचल्यावर लक्षात येते.
कोरोना झाल्यानंतर रुग्णांना नेमके कोणते आणि कसे अनुभव येतात, त्यांच्यासोबत काय काय घडतं याबाबतचा एक किस्सा कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्या एका जेष्ठ रुग्ण महिलेने आपल्या तोंडून आपल्या नातेवाईकांना सांगितला आहे.
घडले असे की दौंड तालुक्यातील एका नातेवाईकने आपल्या शेजारील तालुक्यात असणाऱ्या पाहुण्यांना ज्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाने पीडित होते आणि त्यातून ते नुकतेच बाहेर पडले आहे त्यांना संपर्क साधला आणि त्यांची आपुलकीने विचारपूस केली. नातेवाईकांना अनुभव सांगताना घरातील प्रमुख असणाऱ्या आज्जींना रडू कोसळले आणि पाहुण्यांनी त्यांना धीर देत आज्जी हा कोरोना सर्व देशात आहे आणि त्याने अनेक घरांचे मोठे नुकसान केले आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या आज्जींनी बोलताना बाबा, कोरोना सगळीकडे आहे मला माहित आहे, पण तुझा ‛राहुल’ सगळीकडे नाही ना’ असा प्रतिप्रश्न केल्याने पाहुणेही थोडे आश्चर्यचकित झाले.
त्यांनी आज्जी तुम्ही काय म्हणताय मी समजलो नाही! आणि ‛राहुल’ म्हणजे कोण असा त्यांना प्रश्न केला असता आरं बाबा तुझा त्यो ‛आमदार राहुल’ (rahul kool) म्हणतेय मी असे उत्तर आज्जीने देताच पाहुणेही अवाक झाले. नेमकं आज्जींना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल काय म्हणायचे आहे याबाबत त्यांनी आज्जींना खोलात जाऊन विचारपूस केली असता दौंड तालुक्याच्या दृष्टीने अभिमान वाटावा अशी माहिती आज्जींच्या बोलण्यातून समोर आली.
आज्जींनी आपला आणि आपल्या परिवाराचा संपूर्ण किस्सा सांगताना त्यांचे पती ज्यांचे वय जवळपास 70 वर्षे होते आणि त्यांचा मुलगा जो फक्त 47 वर्षांचा होता हे दोन्ही कोरोनामुळे मरण पावले असल्याचा उल्लेख करत जवळपास 10 ते 12 हजार लोकसंख्या असणाऱ्या आमच्या महत्वाच्या गावात एकही कोविड सेंटर नसावे हि शरमेची बाब असल्याची खंत बोलून दाखवली आणि गावात लोकांना कोरोना झाला की त्यांना तालुक्याच्या शहरी रुग्णालयात असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर त्याठिकाणी होणारे दुर्लक्ष, जेवणाची हेळसांड, औषध, गोळ्यांची गैरसोय आणि लक्ष देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक याचा मोठा अनुभव आज्जींनी त्यांच्या भावकीच्या हवाल्याने सांगितला.
आपला मुलगा या सर्व परिस्थितीला घाबरून कोरोना सोबतच हृदय विकाराच्या धक्क्याने कसा गेला असेल याचाही मागोवा घेतला. आज्जींनी यावेळी कुणावरही आरोप न करता तुमचे नशीब जोरात म्हणून तुम्हाला ‛राहुल’ सारखा आमदार लाभला याबाबत खुलासा करताना तुमच्या तालुक्यात राहुल कुल यांच्याकडून कोरोना
पीडित प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा, इंजेक्शन, औषधे हे वेळेवर मिळतेय की नाही याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. तुमच्या एकाच गावात खाजगी आणि सरकारी मिळून सहा, सात कोविड सेंटर असल्याचे आणि तालुक्यामध्ये अनेक कोविड सेंटर असल्याचे आम्ही ऐकले आहे. त्यामुळे तुमच्या लोकांना गावजवळच उपचार मिळतात, त्यांना आपण आपल्या गावात असल्याने मोठा आधार मिळतो. लोकांची भीती घालवण्यासाठी तुमचे लोक कोरोना रुग्णांची देखभाल, विचारपूस करतात. प्रत्येक रुग्णाला हवा असलेला आधार तुमच्या लोकांमुळे मिळतो आणि माणूस बरा होऊन लवकर घरी जातो असे सांगितले.
आणि आमच्या इथे मात्र कोरोना रुग्णाला एकदा कोविड सेंटरमध्ये आत नेले की त्याला कुणाचा आधार नसल्यासारखा तो आत खितपत पडतो आणि न जाणो तेथे एखादा रुग्ण दगावला की मग त्याची धास्ती दुसरेही घेऊन त्यांनाही मृत्यू समोर दिसू लागतो. कारण क्षुल्लक लक्षणे आणि गंभीर रुग्ण हे एकाच जागी ठेवले की सामान्य रुग्णांवर याचा विपरीत मानसिक परिणाम होतो हे त्यांनी पुराव्यानिशी सांगताना हेच माझ्या मुलासोबतही घडले आणि त्याने याचा ताण घेऊन तेथेच जीव सोडला असल्याचे सांगत तुमचा तालुका खरच एका जबाबदार माणसाच्या हातात आहे बाबा, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी जागच्याजागी मिळतात आणि माणूसही बरा होऊन लेकराबाळांत लवकर जातो असे म्हणत त्या आज्जींना अश्रू अनावर झाले.
हा किस्सा ऐकताना त्या नातेवाईकांना आपण दौंड तालुक्यात असून आमदार राहुल कुल यांच्या नियोजनामुळे येथे सुरक्षित आहोत याचा मात्र नक्कीच अभिमान वाटला.