हार्मोनि ऑरगॅनिक्स कंपनीतर्फे पांढरेवाडी गावात अन्नधान्य कीटचे वितरण, लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजूंना मिळाला आधार



कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाईन(आलीम सय्यद)

 कोरोनाचा सामना करत असताना लॉकडाऊनमुळे रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने गोर गरीब जनता, कष्टकरी, मजूर, हातावर पोट असलेल्या कामगारांचे अन्न धान्यावाचून हाल होऊन त्यांच्यासमोर प्रपंच चालविण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.  अनेक कुटुंबांना अन्न धान्याची गरज  असल्याने अशा गरजू नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता होती अशा नागरिकांना दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील हार्मोनि ऑरगॅनिक्स या कंपनीने  शंभर अन्नधान्य कीट चे वितरण करण्यात आले  आहे. या किट मध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहा पत्ती, १ किलो मीठ, १.५ किलो तूरडाळ, १ मसाला पॅकेट, १ किलो तेल, साबण अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.या शंभर किट चे वितरण ग्रामपंचायत कार्यालय पांढरेवाडी येथे करण्यात आले या किट चे वितरण  कंपनीचे प्रबंधन व्यवस्थापक. दीपक चौधरी व ग्रामसेवक दीपक बोरावके, तसेच गावचे सरपंच छाया झगडे,यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी कंपनीचे  एच आर मॅनेजर महेश दब्बा , जीवन सावंत, संतोष साळवे, आफताब तांबोळी आश्विन तिवारी , नितीन गावडे,उपसरपंच शोभा जाधव , शिक्षक संदीप झगडे आदी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते या कंपनीच्या  माध्यमातून गरजू कुटुंबाना अन्न धान्य दिल्या बद्दल ग्रामपंचायत पांढरेवाडी व या कुटुंबांनी कंपनीचे आभार मानले  आले आहे.