रस्त्यावर येऊन टाळ्या वाजवणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानुसार देशभरात सकाळ पासूनच सर्वत्र शुकशुकाट होऊन जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळत होता. या कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी सर्व नागिरकांना केले होते.

मात्र अनेकांनी थेट घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उतरत टाळ्या आणि थाळ्या वाजवल्याने जनता कर्फ्युच्या मुख्य उद्देशालाच तडा गेला आहे. लोकांनी हे टाळले पाहिजे, आणि रस्त्यावर येऊन, गर्दी करत घोळक्याने रस्त्यावर फिरतानाचे चित्र पहायला मिळाले यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधी आणि जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र जमून घंटानाद करणं अपेक्षित नाही असे सांगितले असून या कृतींमुळे कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या मूळ उद्देशाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी केले आहे.