Categories: Previos News

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, पवारांनी दिलं हे उत्तर

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार साहेब यांना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. या नोटिसमध्ये त्यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञा पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मात्र त्याच वेळी याबाबत खुलासा करताना देशातील सर्व संसद सदस्यांमध्ये आमच्यावरच विशेष प्रेम असल्याचा आनंद आहे असा खोचक टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला आहे.

2009, 2014, आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस देण्यात आली असून यातील काही बाबींबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी बोलताना अगोदर मला नोटीस आली, आता सुप्रियालाही येणार आहे असे समजत असून संपूर्ण देशातील सर्व सदस्यांपैकी आमच्यावरच विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या नोटीसबाबत बोलताना त्यांनी हि नोटीस मला निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन आल्याने त्याचे उत्तर मी लवकरच देणार आहे असे म्हणत त्याचे कारण सांगताना  नोटिशीचे उत्तर दिले नाही तर दिवसाला 10 हजार दंड आकारला जाणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे असं शरद पवार यांनी यावेळी सांगितल आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

15 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

17 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

19 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago