पुणे : सहकारनामा ऑनलाइन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली आहे. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्यांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी काहिदीवस क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादांचा कामाचा झंझावात सर्वांनाच माहीत आहे, सकाळी सर्वात अगोदर उठून जनतेच्या कामाला महत्व देणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसांपासून त्यांना थकवा जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना टेस्ट करवून घेतली आहे.
या टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आढळून आले मात्र थकवा जाणवत असल्याने त्यांनी काहिदीवस म्हणजे साधारण 2-3 दिवस क्वारंटाईन राहतील असे वृत्त प्रसार माध्यमांकडून व्यक्त केले जात आहे.